विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे...; किरीट सोमय्यांचे ट्वीट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kirit-Somaiya

विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे...; किरीट सोमय्यांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : राज्यसभेच्या निवडणूकीतील भाजपच्या विजयानंतर आज पुन्हा विधान परिषदेची निवडणूकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयानंतर भाजपचे नेत किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. विधान परिषद निवडणूक निकाल म्हणजे ठाकरे सरकारचा निकाल असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले आहेत की, उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकारचे दिवस भरले आहेत असे देखील सोमय्या म्हणालेत.

दरम्यान दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे पाच पैकी 4 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची रणनीती राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील यशस्वी ठरली आहे.

हेही वाचा: योजना आवडत नसेल तर...; माजी लष्करप्रमुखांनी आंदोलकांना सुनावलं

हिल्या फेरीच्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसेच पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे देखील विजयी झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्या चुरशीची लढत सुरू आहे.

हेही वाचा: फडणवीसांची रणनीती यशस्वी होणार?; शेवटच्या जागेसाठी चुरस वाढली

Web Title: Bjp Kirit Somaiya Reaction On Mva Govt Over Mlc Election 2022 Result

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top