esakal | 'शिष्यांच्या मुखातून बारामतीकर 'गुरु' तर बोलत नाही ना?'
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Shelar

माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे अंडरवर्ल्डचे संबंध होते, असे संजय राऊत म्हणतात. इंदिरांजीनी लोकशाहीचा गळा घोटला, असे जितेंद्र आव्हाड म्हणतात. या दोघांची ओळख ही बारामतीकर गुरुंचे पट्टशिष्य!

'शिष्यांच्या मुखातून बारामतीकर 'गुरु' तर बोलत नाही ना?'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्यावरील वक्तव्यावरून राजकारण सुरु असताना, भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांकडून मित्रपक्षातील नेत्यांवरच टीका करण्यात येत आहे. यामध्ये संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांची नावे आघाडीवर आहेत. नुकतेच संजय राऊत यांनी एका मुलाखतीत इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्याबाबत वक्तव्य केले होते. तर, बुधवारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीचा गळा घोटला, असे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्यांनी सरकारमधील नेत्यांवर टीका करण्यास सुरवात केली आहे.

शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार : सुधीर मुनगंटीवार

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे अंडरवर्ल्डचे संबंध होते, असे संजय राऊत म्हणतात. इंदिरांजीनी लोकशाहीचा गळा घोटला, असे जितेंद्र आव्हाड म्हणतात. या दोघांची ओळख ही बारामतीकर गुरुंचे पट्टशिष्य! मग.. शिष्यांच्या मुखातून "गुरु" तर बोलत नाही ना? आपले जुने हिशेब चुकते तर करीत नाही ना?