पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणात भातखळकरांनी घेतले मंत्र्याचे नाव, 'मुख्यमंत्री 'राठोडगिरी' सहन करणार का?'

bjp leader atul bhatkhalkar accused shivsena on puja chavan suicide issue nagpur news
bjp leader atul bhatkhalkar accused shivsena on puja chavan suicide issue nagpur news

नागपूर : पुण्यातील पुजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यात विदर्भातील एका मंत्र्याचे नाव चर्चेत होते. त्यावरून आता भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांच्या प्रकरणातील दबंगगिरी सहन केली. त्यावर ते शांत बसले. आता ते आपल्याच पक्षातील मंत्र्याच्या प्रकरणातील  'राठोडगिरी' सहन करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'राठोडगिरी' हा शब्दाचा उल्लेख करून त्यांनी सेनेच्या एका मंत्र्यावर थेट निशाणा साधला.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्यांपासूनच महिलांना धोका आहे. कोणी बलात्मकाराची तक्रार करते, तर कोणी आपली मुलं मंत्र्यांनी पळविल्याची तक्रार करते. आता तर मंत्र्यांमुळे तरुणी आत्महत्या करायला लागल्या आहेत. यांच्या दबावामुळे नातेवाईक तक्रार करायला पुढे येत नाहीत. रक्षकच भक्षक बनले आहेत, असे सणसणीत आरोप भातखळकर यांनी केले. तसेच पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

नेमके काय आहे प्रकरण? -
पुजा चव्हाण (वय २२) या तरुणीने गेल्या रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. रुग्णालयात नेत असताना तिने जीव सोडला. तिचे विदर्भातील एका मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे तिने आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्या संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत कोणीही नाव उघड केलेले नव्हते. आता भातखळकरांनी थेट 'राठोडगिरी' म्हणत मंत्री सेनेचा असल्याचे म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com