राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांचा 'बाप' काढला; ट्विटरवर 'बाप वॉर' सुरू

टीम ई-सकाळ
Wednesday, 14 October 2020

चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. : आमदार शशिकांत शिंदे

पुणे :  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू झालेले वाक् युद्ध आता टोकाला गेले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील बाप वक्तव्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केलीय. तर, चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटवरून राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलंय. 

आणखी वाचा - राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांना मोठी जबाबदारी

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना 'आम्ही तुमचे बाप आहोत,' अशा भाषेत टिप्पणी केली होती. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संपात व्यक्त करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ट्विट करताना, 'सारखं सारखं बाप काढू नका. तुमच्या दिल्लीतल्या बापाला बाप म्हणायला वारसदार पण नाही.' अशी टीका केलीय. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? असा प्रश्नही शशिंकांत शिंदे यांनी उपस्थित केलाय. 

काय म्हणाले शशिकांत शिंदे?
चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात. सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय. त्यांनीही यासाठी ट्विटरचा आधार घेतलाय. त्यात चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, आमची आई आणि बाप हे दोन्हीही जनताच आहे. दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे. तुम्ही सुद्धा पाहिलंय, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil ncp shashikant shinde twitter war