Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला! या दिल्लीवारीचं कनेक्शन अजितदादांशी?

अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द, कारण गुलदस्त्यात
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. राज्यात सध्या पक्ष बदलाचे वारे आणि चर्चा मोठ्या प्रमाणावर दिसून येऊ लागले आहेत. अशातच 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर येऊन गेले त्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आज तडकाफडकी दिल्लीला गेले आहेत.

गेले 2 दिवस अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत होते. आज सकाळी ते नागपूरला परत आले. त्यानंतर सकाळीच ते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे दावे प्रतिदावे यांच्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Ajit Pawar
देशात अन् राज्यात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

तर राज्यातील सरकार स्थिर असल्याचं अजित पवार अधिक गांभीर्याने सांगात आहेत. त्यामुळे ते पक्षांतर करणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. अशातच भाजपचे केंद्रीय मंत्री मुंबईत होते आणि आज चंद्रशेखर बावनकुळे अचानक दिल्लीला जात आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

काल रात्री उशिरा चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात परतले, तर सकाळी ते दिल्लीला रवाना झाले. भाजपच्या मोठ्या नेत्यांची बैठक अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडली. बावणकुळे यांच्या तडकाफडकी दिल्लीला जाण्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्यांच्या नागपूरमधील कार्यालयाकडून ते दिल्लीला गेल्याच सांगण्यात आलं आहे.

Ajit Pawar
Train Accidnet: धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन तो रेल्वे...

काल नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यामध्ये बोलताना नेत्यांनी अनेक तर्क वितर्क लावले. तर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्व नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्यात अजित पवार यांचं कनेक्शन आहे का अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

अशातच अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा काही राजकीय भूकंप होणार आहे का? राजकीय वर्तुळात सुरू असणाऱ्या चर्चा खऱ्या आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Ajit Pawar
Political News: "माझा शिवसेनेतील प्रवेश सुषमा अंधारेंना प्रतिउत्तर देण्यासाठी नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com