गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडू, चित्रा वाघ यांचा गुलाबराव पाटलांना इशारा

Chitra Wagh Warned ShivSena Minister Gulbarao Patil on Hema Malini Remark
Chitra Wagh Warned ShivSena Minister Gulbarao Patil on Hema Malini Remarke sakal

मुंबई : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी (Shivsena Minister Gulabrao Patil) बोदवड नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Actor Hema Malini) गालांची तुलना रस्त्यांसोबत केली. ''हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईन'' असं वक्तव्य पाटलांनी केलं होतं. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी थोबाड फोडण्याचा इशारा पाटलांना दिला आहे.

Chitra Wagh Warned ShivSena Minister Gulbarao Patil on Hema Malini Remark
हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईन - गुलाबराव पाटील

''गुलाबराव पाटील आणि रांझ्याच्या पाटलाची वृत्ती सारखीच'' -

''शिवसेनेच्या नेत्यांना झालंय काय? संजय राऊतांनंतर आत्ता गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील या दोघांची वृत्ती सारखी आहे. महाराजांनी रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी काढून घेतली होती. आता गुलाबरावाची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार?'' असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

'...तर थोबाड फोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही' -

''शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरत आहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसत आहेत. पण यामध्ये पोलिस यंत्रणांना महिलांचा विनयभंग दिसत नाही.मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तत्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'', असा सज्जड दम चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.

दरम्यान, भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रंगलेल्या गालांच्या मुक्यासंदर्भातील वक्तव्यावरून महाविकास आघाडीतील नेते संतप्त झाले होते. आता गुलाबराव पाटलांविरोधात ते काय कारवाई करतील? असा सवाल प्रविण दरेकरांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील? -

जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. यावेळी गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंवर टीका करताना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांची तुलना रस्त्यांसोबत केली. गेल्या ३० वर्षात आमदार राहिलेल्या लोकांनी माझ्या मतदासंघात येऊन पाहावं. हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते नसतील तर राजीनामा देऊन टाकेन, असं गुलाबराव पाटील म्हणाले. बोदवडच्या रस्त्यांच्या उल्लेख करत अरे काय हे रस्ते? तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला अक्कल शिकवता. आधी तुमच्या बोदवडचे रस्ते बांधा, असा टोला एकनाथ खडसेंना लगावला.

एकनाथ खडसेंनी काय दिलं उत्तर? -

गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याबद्दल एकनाथ खडसेंना विचारलं असता, ते म्हणाले ''गुलाबराव पाटलांनी निवडणुकीच्या ओघात असं वक्तव्य केलं असावं. प्रत्येकजण आपआपल्या कुवतीनुसार बोलत असतो. त्यामुळे यावर मी जास्त टीका-टीप्पणी करणार नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com