'वर्क फ्रॉम होम'च्या मुद्द्यावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला

'वर्क फ्रॉम होम'च्या मुद्द्यावरून भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला लोकल प्रवास, शाळा-शिक्षण या विषयांवरही व्यक्त केलं रोखठोक मत BJP Leader Keshav Upadhye taunts Uddhav Thackeray over Work From Home vjb 91
Uddhav-Work-From-Home
Uddhav-Work-From-Home

मुंबई: गेले दीड वर्ष भारतीय जनता कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. महाराष्ट्रात पहिल्या लाटेत कोरोना नियंत्रणात होता. पण दुसऱ्या लाटेत मात्र हाहा:कार माजला. मधल्या काही महिन्यांत तर दररोजच्या कोरोना रूग्णसंख्येने नवनवे उच्चांक गाठले. पण आता मात्र कोरोना पुन्हा आटोक्यात आला आहे. अशा वेळी नागरिकांवर लादलेले निर्बंध हटवून जनजीवन तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावरूनच भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. (BJP Leader Keshav Upadhye taunts Uddhav Thackeray over Work From Home)

Uddhav-Work-From-Home
अंधेरीत कोसळली चार मजली इमारत

"आज उद्धव ठाकरे मंत्रीमंडळाची बैठक आहेत. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री #workFromHome करू शकतात, पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते", असा टोला उपाध्ये यांनी लगावला. "लोकलप्रवासबंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्य सरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा", असा इशारादेखील त्यांनी दिला.

Uddhav-Work-From-Home
कायलीच्या तोंडी आले 'ते' शब्द; आई म्हणाली 'तुला मी नंतर बघते'

"मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा. मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी", अशी मागणीदेखील त्यांनी केली.

Uddhav-Work-From-Home
'बर्तनवाली', 'सिंगल मदर'ची स्क्रिप्ट दाखवून ओढायचे पॉर्नच्या जाळ्यात, समोर आली धक्कादायक माहिती

दरम्यान, आज मंत्रीमंडळाची बैठक होणार असून त्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com