esakal | ''ओमकार बिल्डर आणि पवारांचे संबंध काय? अजित पवारांनी स्पष्ट करावे''
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar kirit somaiya

''ओमकार बिल्डर आणि पवारांचे संबंध काय? अजित पवारांनी स्पष्ट करावे''

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखान्याचा (Jarandeshwar sugar factory) मालक, चालक आणि लाभार्थी कोण आहे? याचे अजित पवारांनी उत्तर द्यावे. २७ हजार शेतकऱ्यांनी हा कारखाना उभा केला. त्यांना मी भेटलो. त्यांना देखील या कारखान्याचा मालक कोण हाच प्रश्न आहे. पवारसाहेब राजकारण सोडून अर्थकारणावर बोला ना, असे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit somaiya) म्हणाले. आज त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: अजित पवार कधी कुठलीच कागदपत्रे दडवत नाहीत - जंयत पाटील

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर त्यांचं सरकार होतं. त्यावेळी त्यांनी किती कारखाने घेतले. कारखान्यात किती शेतकरी भागधारक होते? जरंडेश्वर साखर कारखान्याचा सातबारा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मालकीची लेयर ही पुढे पुढे जात आहे. खरं मालक चालक लाभार्थी हे अजित पवारांना माहिती आहे. ते का घोषित करत नाही. प्रश्न एका साखर कारखान्याचा नाही. ही मोडस ऑपरेंडी आहे, असेही किरीट सोमय्या म्हणाले.

मुंबई उच्च न्यायालयाने कारखान्याच्या चौकशीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्याची चौकशी दाबण्याचा ठाकरे सरकार प्रयत्न करत आहे. अजित पवारांनी हा साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला. जरंडेश्वर कारखान्याकडे लक्ष का? असे म्हणत अजित पवार साताऱ्यात गेले होते. पण, माझा कारखाना असे ते सांगत नाहीत. रेकॉर्डमध्ये जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक तुरुंगात आहे. पण, खरा मालक बाहेर आहे. हा कारखाना गुरू कमोडिटी ओमकार बिल्डरने जरंडेश्वर साखर कारखान्याला लिजवर दिला होता. अजित पवार त्यांना दरवर्षी किती भाडं देतात हे देखील स्पष्ट करावे. अजित पवार आणि ओमकार बिल्डरचे संबंध काय? यावर शरद पवार आणि अजित पवार का बोलत नाहीत? त्यांची वकिली का करतात. ओमकार बिल्डरला कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कोणी दिले? असे अनेक सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले.

loading image
go to top