esakal | 1500 कोटींच्या घोटाळाप्रकरणात मुश्रीफांविरुध्द सोमय्या पुण्यात तक्रार दाखल करणार I Kirit Somaiya
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा आक्रमक झाले आहेत.

1500 कोटींच्या घोटाळाप्रकरणात मुश्रीफांविरुध्द सोमय्या तक्रार दाखल करणार

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

-सुशांत सावंत

मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit somaiya) पुन्हा आक्रमक झाले असून मुश्रीफ यांच्या विरोधात आज ते दुपारी 1 वाजता पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीचे बडे नेते सोमय्यांच्या रडारवर असून सोमय्यांनी त्यांचे घोटोळे बाहेर काढण्याचा इशारा दिलाय.

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते सोमय्या यांनी आतापर्यंत आघाडीच्या एकूण 11 मंत्री आणि नेत्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचेही नाव जाहीर केले असून सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लाँड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे, तसेच इतर अनेक गैरव्यवहार करण्याचे गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत. मुश्रीफ यांनी प्रथमदर्शनी 127 कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केलेय. आता त्यांनी पुन्हा मुश्रीफांवर ग्रामपंचायत कंत्राटीत 1500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून आज पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय.

हेही वाचा: 'त्यांना'च शिव्या देतो अन् त्यांच्याशी चर्चा करायला जातो : शिवेंद्रसिंहराजे

मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपनी असून या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आपल्याकडे आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आता त्यांनी मुश्रीफांवर आणखी एक आरोप केला आहे. तर, जरंडेश्वर साखर कारखान्याचा (Jarandeshwar sugar factory) मालक, चालक आणि लाभार्थी कोण आहे? याचे अजित पवारांनी उत्तर द्यावे. २७ हजार शेतकऱ्यांनी हा कारखाना उभा केला. त्यांना मी भेटलोय. त्यांना देखील या कारखान्याचा मालक कोण हाच प्रश्न पडलाय, असा आरोप करताना सोमय्यांनी अजित पवारांवर निशाणा मुंबईतील पत्रकार परिषदेत निशाणा साधला होता, त्यामुळे पुण्यातील पत्रकार परिषदेत मुश्रीफांसोबत सोमय्या पवारांवर निशाणा साधणार का? हे आता दुपारीच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा: प्रियकरासोबत आईचं 'सैराट' पलायन; मुलीनं थाटला मुलाच्या बापाशीच 'संसार'

loading image
go to top