esakal | प्रियकरासोबत आईचं 'सैराट' पलायन; मुलीनं थाटला मुलाच्या बापाशीच 'संसार' I Girlfriend Mother
sakal

बोलून बातमी शोधा

Britain
मला माझ्या प्रियकराच्या वडिलांना दुःखी बघायचं नव्हतं, त्यांना खूश करण्यासाठी मी हा निर्णय घेतलाय.

प्रियकरासोबत आईचं 'सैराट' पलायन; मुलीनं थाटला मुलाच्या बापाशीच 'संसार'

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

ब्रिटन : ब्रिटनमध्ये (Britain) नाते संबंधाला काळिमा फासणारं एक विचित्र प्रकरण समोर आलंय. ग्लूस्टरशायरमध्ये एक महिला तिच्या मुलीच्या प्रियकरासह पळून गेलीय. यानंतर, मुलीनं प्रियकराच्या वडिलांशीच लग्न केलंय. जेव्हा लोकांनी तिला विचारलं की, तू असं का केलंस? त्यावर ती म्हणाली, मला माझ्या प्रियकराच्या वडिलांना दुःखी बघायचं नव्हतं, त्यांना खूश करण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असं ती सांगते.

या महिलेनं सोशल मीडियावरुन सांगितलं, की माझ्या प्रियकराच्या आईचं निधन झालंय आणि मला प्रियकराच्या वडिलांना दुःखी बघायचं नव्हतं, म्हणून मी त्याच्या वडिलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कदाचित, हा माझा निर्णय चूक आहे, की बरोबर माहित नाही. पण, माझ्या या निर्णयामुळे प्रियकराला पुन्हा आई मिळालीय, हे महत्वाचं आहे.

हेही वाचा: जेव्हा नोबेल ॲकॅडमीचा Call आला, तेव्हा कादंबरीकार गुर्नाह स्वयंपाक करत होते!

खरं तर, 24 वर्षांची गर्भवती जेस एल्ड्रिजचा प्रियकर रयान शेल्टन तिच्या आईबरोबर घरातून पळून गेला, त्यानंतर जेसनं ग्लूस्टरशायरमध्ये रयानच्या वडिलांशी लग्न केलंय. रयान शेल्टन हा कोरोना महामारीमुळं त्याची मैत्रीण जेसची आई जॉर्जिना आणि वडील एरिक यांच्यासोबत दीर्घकाळ ग्लूस्टरशायरमधील एकाच घरात राहत होता. जेसला आधीच तिची आई आणि प्रियकर यांच्यात काही अफेअर असल्याचा संशय होता.

हेही वाचा: 14 वर्षापूर्वी ज्यानं वाचवलं, त्याच्याच कुशीत गोरिलानं सोडला अखेरचा श्वास

नऊ महिन्यांनंतर, जेव्हा जेस तिच्या मुलाला जन्म देऊन हॉस्पिटलमधून परतली, तेव्हा तिची आई रयानसोबत पळून गेली होती. जेसच्या आईनं तिला सांगितलं, की आम्ही कोणावर प्रेम करतो, हे आम्ही ठरवू शकत नाही. त्यामुळे मी हा निर्णय का घेतला याचं उत्तर मला तुला देता येत नाही, असं ती म्हणाली. जेस म्हणाली, मी त्या दोघांच्या निर्णयावर अजूनही नाराज आहे. त्यांना वाटतं, की ते एकत्र पळून जाऊ शकतात आणि मला दोन लहान मुलांची काळजी घेण्यासाठी सोडू शकतात. पण, मला विश्वासच बसत नाही, की आईनं अजूनही 'सॉरी' म्हणायची कोणतीही तसदी घेतली नाही. यामुळे मला तिचा खूप राग आहे.

हेही वाचा: शारीरिक संबंधांमुळे फक्त दुःख मिळते, मॉडलने सांगितला अनुभव

loading image
go to top