किरीट सोमय्या राजकीय क्षेत्रातील 'आयटम गर्ल' - नवाब मलिक

नाना पटोलेंनतर आता नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान
Nawab Malik_Kirit Somaiya
Nawab Malik_Kirit Somaiya

नांदेड : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या वादग्रस्त विधानांमुळं ढवळून निघालं आहे. त्यातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. किरीट सोमय्या हे राजकीय क्षेत्रातील आयटम गर्ल (Item Girl in Politics) असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मलिक यांच्या या विधानामुळं आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे, नांदेड इथं माध्यमांशी बोलत होते. (BJP leader Kirit Somaiya Item Girl in Politics says Nawab Malik)

Nawab Malik_Kirit Somaiya
महाराष्ट्रात गारठा आणखी वाढणार! पुढच्या दोन दिवसात थंडीची लाट

मलिक म्हणाले, एखादा सिनेमा चालावा यासाठी त्यात आयटम गर्लची गरज असते तशी प्रसिद्धीसाठी किरीट सोमय्या हे राजकारणातील भाजपचे आयटम गर्ल बनले आहेत. मलिक यांनी त्यांच्यावर सोमय्या यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना हे विधान केलं. सोमय्या म्हणाले होते की, नवाब मलिक यांना मला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. कारण त्यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होत की, बीड जिल्ह्यातील देवस्थानची जमीन कुणाला दिली याची चौकशी सरकार करणार आहे. खरंतर ही जमीन धनंजय मुंडे यांनीच खाली आहे. पण मी आता रायगडच्या कर्जमधील देवस्थानच्या जमिनीचा सातबारा माझ्याकडे आला आहे. या व्यक्तीकडे ही देवस्थानची जमीन गेलीच कशी, असा सवाल विचारत संबंधित व्यक्तीची चौकशी व्हायला पाहिजे असं सोमय्या म्हणाले होते.

Nawab Malik_Kirit Somaiya
नितेश राणेंची आता अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात धाव

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी मी मोदीला मारु शकतो, असं विधान केलं होतं. पण यावरुन भाजपनं मोठा गदारोळ माजवल्यानंतर आपण स्थानिक गावगुंड ज्याला मोदी संबोधलं जात त्याला उद्देशून हे विधान केल्याचं स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com