Vidhan Sabha 2019 : पंकजा मुंडेंना प्रचारादरम्यान चक्कर (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

भाजपच्या उमेदवार आणि राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान चक्कर आली.

बीड : भाजपच्या उमेदवार आणि राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना प्रचारादरम्यान चक्कर आली. त्यामुळे त्या खाली कोसळल्या. बीडमध्ये त्यांची शेवटची सभा होती. या सभेदरम्यानच त्यांना चक्कर आली. 

परळी विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा सुरु होती. त्यादरम्यान पंकजा मुंडे यांना चक्कर आली. पंकजा मुंडे यांचं या निवडणुकीसाठी शेवटचं भावनिक भाषण झाले. या भाषणानंतर पंकजा मुंडे दहा मिनिटं स्टेजवर होत्या. त्यांना अचानक चक्कर आल्यानंतर एकच धावपळ उडाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांचे पती अमित पालवे त्यांच्यासोबत उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Leader Pankaja Munde not Feeling well Collapsed during Election Rally