esakal | मुख्यमंत्र्यांची जात काढत होता, तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं - पंकजा मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं- पंकजा मुंडे

sakal_logo
By
दीनानाथ परब

बीड: 'आधीच उपाशी त्यात उपवास अशी आज ओबीसीची (obc) स्थिती आहे' माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी एका कार्यक्रमात हे मत व्यक्त केलं. "अनेक गावात अजूनही जातीच्या भिंती आहेत. समाजात अजूनही दरी दिसतेय" असे पंकजा म्हणाल्या. "मी मुंडे साहेबांना प्रश्न विचारला तुमच्या राजकारणाचे मूळ काय ? ते म्हणाले, जो मंचावर नाही, सत्तेत नाही, त्याला सत्तेवर बसवणं हे माझ जीवनातलं मूळ आहे. मुंडें साहेबांनी सामान्यांना मंचावर आणलं" असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

"आरक्षणाचा लढा कशासाठी आहे, जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी आहे. जो जास्त संख्येने आहे, तो बहुजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १० टक्के आरक्षण दिलं, ज्यांची आर्थिक ताकत नाही त्या सर्वांना त्यांनी आरक्षण दिलं" असं पंकजा मुंडे म्हणाल्या. "आज महाराष्ट्रात ओबीसींची, बहुजनांची अशी परवड का आहे ? जो जास्त संख्येने आहे तो बहुजन. मग कोण आहे बहुजन? ज्याला न्याय नाही, नोकरी, आरक्षण आणि संरक्षण नाही मिळालं तो बहुजन आहे. आजही जातीच्या नावावर गावात शतेकऱ्यांवर, महिलांवर अत्याचार होतात. आजही जात बघून भाषण करण्यासाठी जातात" अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

हेही वाचा: लहान मुलांसाठी आपत्कालीन वापराला 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी

"या देशामध्ये अनेक राज्य आहेत. त्यांनी आपल्या राज्यात, मंत्रिमंडळात विधानसभेत निर्णय घेऊन बहुजनांना न्याय दिला. ओबीसीला धोका देण्याचं षडयंत्र रचत असाल, तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही. माझा जन्म १९७९ साली झाला. तेव्हापासून ही लढाई सुरु आहे. अजूनही समाजाला न्याय मिळत नाही ही दुर्देवाची गोष्ट आहे" असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा: मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदाराला गडकरींचा झटका

"बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं काम सुरु आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडला की, काही लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात. मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. मुख्यमंत्र्यांची जात काढत होता, तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं" असं पंकजा म्हणाल्या. "मराठा समाजाची आरक्षणाची मागणी काय आहे, शिक्षणात नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे. राजकीय सत्ता असून सुद्धा भलं झालं नाही. मराठा समाजाची शिक्षण, नोकरीमध्ये आरक्षणाची मागणी आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण हवं आहे, दोन्ही समाजांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत" असे पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

loading image
go to top