esakal | खूशखबर! लहान मुलांसाठी आपत्कालीन वापराला 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

CHILD VACCINATION

लहान मुलांसाठी आपत्कालीन वापराला 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत आता आणखी एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. कारण लहान मुलांसाठी कोविड -१९ संबंधीच्या विषय तज्ज्ञ समितीनं डीसीजीआयकडं भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीची शिफारस केली आहे. त्यामुळं लवकरच दोन ते अठरा वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरु होणार आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेकनं सप्टेंबर महिन्यात दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिन लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली होती. त्यानंतर हा चाचणीचा डेटा ड्रग अँड कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पाठवून दिला होता.

हेही वाचा: निवडून मानवाधिकाराचे मुद्दे उचलणारे देशाची प्रतिमा मलिन करताहेत - PM

दरम्यान, विषय तज्ज्ञ समितीनं (SEC) आपल्या निवेदनात म्हटलं की, "सविस्तर विचारविनिमयानंतर, आपत्कालीन परिस्थितीत 2 ते 18 वयोगटातील मुलांना वापरासाठी कोव्हॅक्सीन लसीला बाजार प्राधिकरणाची परवानगी देण्याची शिफारस डीसीजीआयकडं करण्यात आली आहे"

लहान मुलांसाठी कसा असेल डोस?

भारतात तयार करण्यात आलेल्या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. यासाठी दोन डोसमध्ये २० दिवसांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तर मोठ्या व्यक्तींसाठी असलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये ४ ते ६ आठवड्यांचं अंतर आवश्यक आहे.

१२ ते १८ वयोगटासाठी ZyCov-D ला मंजुरी

ऑगस्टमध्ये भारतानं ZyCov-D लसीला १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालिन वापराला मंजुरी दिली आहे. या लसीची निर्मिती Zydus Cadila या फार्मा कंपनीनं केली आहे. ही पहिली डीएनएवर आधारित लस असून याला जगानं मान्यता दिली आहे.

loading image
go to top