Maharashtra Politics: हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभेला उभे रहा, भाजप नेत्याचं रामराजेंना आव्हान? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics: हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभेला उभे रहा, भाजप नेत्याचं रामराजेंना आव्हान?

Maharashtra Politics: हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभेला उभे रहा, भाजप नेत्याचं रामराजेंना आव्हान?

एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांना आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर माझ्याविरोधात लोकसभेत उभे राहून दाखवा, असं आव्हान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे यांना दिलं आहे. भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर हे सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या माढा लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय शिंदे यांचा पराभव करून माढ्यात कमळ फुलवलं होतं.

रामराजेंना आव्हान देताना रणजितसिंह निंबाळकर म्हणालेत की, ‘ भाजप तर सोडा यांना राष्ट्रवादीही परत तिकीट देणार की नाही याची शंका आहे. कारण यांच्यावर विश्वासच राहिला नाही. फलटणची विधानसभा राखीव आहे. त्यांच्यातील पिल्लावळ बोलत असते. मी तर आजच जाहीर सांगतो, ज्याला कुणाला खूमखूमी आहे. त्यांनी माझ्याविरोधात लोकसभा लढवा. नाही तर माण तालुक्यात जाऊन विधानसभा लढवा. बघू किस में कितना है दम. आजच सांगतो, आणि जाहीर आव्हान देतो. या माझ्याविरोधात लढा’

रामराजे निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते आहेत.

Web Title: Bjp Leader Ranjit Singh Nimbalkars Challenge To Ramraje Nimbalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..