esakal | 'पंकजा मुंडे पुढच्याही जन्मी भाजपच्याच सदस्य'
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

'पंकजा मुंडे पुढच्याही जन्मी भाजपच्याच सदस्य'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : नुकतेच भाजप नेत्या पंकजा मुंडे (bjp leader pankaja munde) आणि खासदार प्रितम मुंडे (mp pritam munde) या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये (union cabinate expansion) मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले होते. पंकजा मुंडे दुसरा पर्याय स्वीकारणार का? अशाही चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडेंनी स्वतःची भूमिका जाहीर केली होती. आता त्यावरच भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार (bjp mla sudhir mungantiwar) यांनी भाष्य केले आहे. (bjp leader sudhir mungantiwar reaction on pankaja munde)

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

आमच्या पक्षात हजारो लोक आहेत जे आमच्यापेक्षा कार्यक्षम आहेत. देवेंद्र फडणवीसांपेक्षा कार्यक्षम आहेत. आमच्यापेक्षा लायक पात्र लोक खाली बसलेले असतात. त्यामुळे मला अजूनही वाटतं की, पंकजाताई या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षात राहतील. मात्र, पुढच्या जन्मी देखील त्या भाजपच्याच सदस्य असतील, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

'गडकरी सांगतात...'

मुनगंटीवारांनी पक्षबदलाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, ''गडकरी सांगतात, ज्या दिवशी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार मनात येईल त्यावेळी मी एकदा विहिरीत उडी मारेन. जीव देईन. पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही. कारण दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याला कारणीभूत म्हणजे आमची पक्षासोबत असलेली बांधिलकी. आमची बांधिलकी पदासोबत नाही, स्वार्थाशी नाही, तर पक्षाशी आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

पंकजा मुंडे नाराज होत्या?

नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये खासदार प्रितम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्ष मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यावेळी वंजारी समाजाच्या भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाराज नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यावेळी पंकजा मुंडे यांना अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यांची छुपी नाराजी जाहीर केल्याचेही बोलले गेले. दुसऱ्याच दिवशी पंकजा मुंडे यांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले. त्यातच पंकजा मुंडे यांनी दिल्ली जाऊन पंतप्रधान मोदींची भेट देखील घेतली. त्यामुळे त्या काहीतरी वेगळा पर्याय निवडतील, अशी चर्चा होती. कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरू असतानाच त्यांनी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेऊन राजीनामे मागे घ्या, अशी सूचनाही दिल्या होत्या.

loading image