esakal | ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा!
sakal

बोलून बातमी शोधा

...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

sakal_logo
By
सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर) : सोमवारी दुपारनंतर चार वाजता दुकाने बंद करण्याच्या वेळेत स्थानिक संताजी जगनाडे चौकात नेहमीपेक्षा काही वेगळीच हालचाल सुरू झाली. अर्ध्या तासाच्या अंतराने काही चार चाकी वाहनातून चित्रपटाच्या चित्रीकरणाचे साहित्य, चित्रपट सृष्टीतील नट, नटी व अन्य लोकांनी पसारा मांडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लोकांनी कुतूहलापोटी त्या ठिकाणी एकच गर्दी केली. एका मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री उमरेडकरांना नजरेसमोर भल्यामोठ्या कॅमेऱ्यासमोर हालचाल करतानाना दिसल्याने लोकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत एकच गर्दी केली. काही वेळातच असे लक्षात आले की चित्रपट चित्रीकरणाचा सर्व पसारा उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यातील एका रिसॉर्ट मालकाचा आहे. आता सांगा कुठे गेले शासनाचे नियम आणि कुठे गेला कोरोना. (film-shooting-Filming-by-breaking-the-rules-Crowds-of-citizens-Nagpur-News-nad86)

दीड वर्षांपासून अवघ्या जगाला कोरोनाचे ग्रहण लागले असतानाच सर्वत्र कडेकोट नियमांचे पालन करत गर्दीचे सर्व ठिकाण (शाळा, महाविद्यालये इ.) बंद केले आहेत. ते आजतागायत बंदच आहेत. नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकांचे कुटुंब उध्वस्त झालेत. आता काहीशी दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

त्याच पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत सकाळी ७ ते ११ बाजारपेठ सुरू ठेवण्याची वेळ दिलेली आहे. परंतु, बाजारपेठेत नगर परिषद प्रशासनाकडून कोरोनाचे सर्व नियम हे फक्त गोर गरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी, छोट्या दुकानासाठी आहेत. मात्र धनाढ्य, श्रीमंत व मोठ्या प्रतिष्टीत लोकांना नियम नाही, असा भेदभाव करत असल्याचा आरोप लोकांकडून केला जात आहे.

अशा परिस्थितीत चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची परवानगी दिलीच कशी, या गर्दीने लोकांना कोरोनाची लागण होणार नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘सकाळ’ प्रतिनिधीने याचित्रीकरणाच्या परवानगीबाबत प्रभारी मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

चित्रीकरणाची परवानगी दिली का?

चित्रीकरणादरम्यान काही काळ वाहतूक ठप्प झाली. विशेष म्हणजे त्या चित्रीकरणाची नगर परिषदेने परवानगी दिली असावी का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मेश्राम यांनी उपस्थित केला. नगर परिषद प्रशासनामार्फत वेळोवेळी सर्वसामान्य जनतेवरच नियम लादले जातात. नियमांच्या नावावर त्यांचे शोषण व पिळवणूक केली जाते. मात्र, श्रीमंत लोकांना तोंड पाहून मुभा दिली जाते असा घणाघात यावेळी त्यांनी केला.

(film-shooting-Filming-by-breaking-the-rules-Crowds-of-citizens-Nagpur-News-nad86)

loading image