'...तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागेल'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 January 2020

मुंबई: भीमा कोरेगवा प्रकरणात शिवसेना आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री मंत्री दिपक केसरकर दोषी असल्यास या प्रकरणाची चौकशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कशी करणार? त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायऊतार व्हावे लागेल, असे भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भीमा कोरेगाववरुन परस्परविरोधी विधानं करणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना राज्यातल्या पोलिसांवर संशय आहे का? तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या कामावर त्यांना शंका आहे का? केसरकर शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे या प्रकरणात शिवसेना दोषी आहे का? असे प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले. 

INDvsNZ:श्रेयस अय्यरनं विश्वास सार्थ ठरवला; टीम इंडियाचा दणदणीत विजय

भीमा कोरेगाववरुन महाविकास आघाडीतले दोन पक्ष आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण तत्कालीन सरकारनं पोलिसांच्या मदतीनं घडवलेलं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला. या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. मात्र या प्रकरणातले पुरावे पोलिसांनी खातरजमा करुनच दाखल केलेले असून ते न्यायालयानंदेखील मान्य केलेले आहेत, अशी भूमिका तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मांडली आहे. त्यामुळे भीमा कोरेगाववरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader sudhir mungantiwar slams shiv sena and ncp