अण्णा हजारेंचे मन वळविण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ राळेगणसिद्धीत, अण्णा आंदोलनावर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP leaders met Anna Hazare at Ralegan Siddhi

विधानसभेचे माजी सभापती व आमदार हरीभाऊ बागडे व खासदार डॉ. भागवत कराड, भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली.

अण्णा हजारेंचे मन वळविण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ राळेगणसिद्धीत, अण्णा आंदोलनावर ठाम

पारनेर ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतक-यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने दिलेली अश्वासने न पाळल्याने हजारे यांनी आंदोलनाचा इशारा देताच केंद्र सरकारला जाग आली.

आज (ता.21 ) विधानसभेचे माजी सभापती व आमदार हरीभाऊ बागडे व खासदार डॉ. भागवत कराड, भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. आपल्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ. आम्हाला थोडा वेळा द्या अशी विनंती केली. या वेळी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या शेतकरी कायद्यांचीही माहिती हजारे यांना दिली. या वेळी हजारे यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत व नवीन कृषी कायद्यावर मी बोलणार नाही. मी माझ्या मागण्यावर ठाम आहे. 

आज बागडे व कराड यांनी हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी हजारे यांनी नवीन कृषी कायद्याबाबत काहीच न बोलता मला केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी जे अाश्वासन दिले ते पाळले नाही. त्यामुळे मी पुन्हा आंदोलनाचा विचार मांडला आहे. मार्च 2018 साली दिल्लीत व फेब्रुवारी 2019 साली राळेगणसिद्धीत मी शेतक-यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलन केले. त्यावेळी केलेल्या मागण्यांबाबत मला केंद्रीय कृषी मंत्री, तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्रीव संरक्षण राज्यमंत्री यांनी लेखी अश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळले नाही. त्यास दोन वर्ष झाली. त्यामुळे मी आंदोलनाचा विचार करीत आहे.

हेही वाचा -  नगर-सोलापूर महामार्ग चौपदरीकरणाची निविदा निघाली

शेतक-यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर  स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, त्यासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव सरकराने शेतक-यांना द्यावा, कृषीमूल्य आयोगास स्वायत्तता द्यावी व भाजीपाला दूध व फळे यांनाही उत्पादन खर्चावर अधारीत बाजार भाव दिला. ठिबक व तुषार सिंचनवर अनुदान दिले तर शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील असेही म्हणाले.

या वेळी कराड व बागडे यांनी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कृषी कायद्याची माहिती हजारे यांनी दिली. तो कसा शेतकरी हिताचा आहे, हेही सांगितले. या वेळी त्यांनी कृषी सुधार विधयकाची मराठी भाषेत रूपांतरीत केलेली पुस्तिकाही हजारे यांनी माहितीसाठी दिली.  

या वेळी हजारे यांनी नव्याने केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यातील काही कायदे रद्द केले तरी शेतक-यांचे  प्रश्न सुटणार नाहीत. त्या साठी मी माझ्या मागण्यांवर ठाम आहे.  

अण्णांना म्हणाले, थोडं थांबा

तुमच्या मागण्या योग्य व शेतकरी हिताच्या आहेत. तुमचे गा-हाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पोहच करू. मात्र, सध्या तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. तसेच लवकरच आपली एकत्रित या विषयावर बैठकही लावू असे अाश्वासन या वेळी बागडे व खासदार कराड यांनी दिले.

Web Title: Bjp Leaders Met Anna Hazare Ralegan Siddhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top