...अन्यथा राज्य सरकारविरोधात एल्गार; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा

BJP Strike
BJP Strikesakal media

मुंबई : विद्यापीठ कायदा बदलामुळे (Amendment in University laws) विद्यापीठांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढेल, असा आरोप करीत भाजपच्या विद्यार्थी (BJP Students union) आघाडीने आज मुंबई विद्यापीठासमोर (Mumbai university) जोरदार आंदोलन (strike) केले. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat lodha) यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आघाडीने हे आंदोलन केले. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेर जमून सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. कायद्यातील हा बदल मागे घ्यावा, अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही लोढा यांनी यावेळी दिला. (BJP mangal prabhat lodha gives warning of big strike against Maharashtra government on Amendment in University laws)

BJP Strike
'चोर सोडून संन्याशाला फाशी'; मंगलप्रभात लोढा यांची प्रशासनावर टीका

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विद्यापीठ कायदा बदलाचे विधेयक कोणतीही चर्चा न करता घाईगडबडीत मंजूर केले. यातील प्रमुख बदलांनुसार विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती आता राज्य शासन करणार आहे. तसेच कुलपती या पदाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने प्र-कुलपती या नवीन पदाची निर्मिती केली आहे. या पदावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असतील. त्यामुळे विद्येच्या मंदिरात म्हणजेच विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप नकळतपणे वाढणार असून हे मुंबई भाजप तसेच विद्यार्थी आघाडी खपवून घेणार नाही, असा इशाराही लोढा यांनी यावेळी दिला.

विद्यापीठ कायदा बदलाचा आम्ही निषेध करतो. विद्यापीठात सरकारला राजकीय हस्तक्षेप करू देणार नाही. विद्यार्थ्यांचा स्वाभिमान जपण्यासाठीच हे आंदोलन केले जात आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजपा विद्यार्थी आघाडी संघटनेचे मुंबई अध्यक्ष सुजय चोकसी आणि भाजपा युवा दक्षिण मुंबई अध्यक्ष सनी सानप उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com