'चोर सोडून संन्याशाला फाशी'; मंगलप्रभात लोढा यांची प्रशासनावर टीका

ग्राहकाच्या चुकीची शिक्षा दुकानदाराला
Mangal prabhat lodha
Mangal prabhat lodhasakal media

मुंबई : दुकानात आलेल्या ग्राहाने (consumer without mask) मास्क न लावल्यास दुकानदाराला मोठा दंड (fine to shopkeeper) आकारण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मुंबई भाजप व्यापारी सेलच्या (BJP traders union) शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat lodha) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या व्यापारी सेल च्या शिष्टमंडळाने नुकतीच अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार (sanjeev kumar) यांची भेट घेऊन ही मागणी केली. (there should not be fine to shopkeeper when consumer is responsible mangal prabhat lodha criticizes government)

Mangal prabhat lodha
केंद्राच्या नियमानुसार लॉकडाऊन लावावं लागेल - पेडणेकर

दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क न घातल्यास त्याला फक्त पाचशे रुपये दंड आकारला जाईल. पण संबंधित दुकान अथवा आस्थापनेला दहा हजार रुपयांचा दंड करण्याचा सरकारचा आदेश आहे. तो आदेश राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशीही मागणी शिष्टमंडळाने केली. ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे लूटच असल्याची टीकाही लोढा यांनी यावेळी केली. हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयामुळे दुकानदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. तसेच लहान दुकानदारांची गैरसोय होणार आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल, याकडेही भाजपा व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. कारण दिवसभरात एखादा असा चुकार ग्राहक आल्यास होणाऱ्या दंडाची रक्कम मोठ्या दुकानदारांच्याही रोजच्या कमाईपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मोठ्या आणि छोट्या दुकानदारांसमोरील अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे या नियमांत सुधारणा करून दुकानदारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली. यावेळी मुंबई भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष जयेश जरीवाला, जयेश जोशी, अल्पेश शहा, प्रदीप शर्मा, सवेश प्रतापसिंह आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिल्याचे मुंबई भाजपच्या पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com