Kapil Patil : भाजप केंद्रीय मंत्र्याच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट; पैशाची केली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil Patil

Kapil Patil : भाजप केंद्रीय मंत्र्याच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट; पैशाची केली मागणी

मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक काढून पैशाची मागणी करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बनावट फेसबुक अकाऊंट काढल्याच्या प्रकरणातून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फेसबुक अकाऊंटमार्फत १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती.

(Cabinet Minister Kapil Patil Fake facebook Account)

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढण्यात आले होते. त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या आणि १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर फेसबुक अकाऊंट ब्लॉक करण्यात आले आहे.

हेही वाचा: Kashmir: धक्कादायक! काश्मिरमध्ये ८ तासांत दुसरा स्फोट; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

आरोपीविरोधात भादवि कलम ४१९, कलम ६६क, कलम ६६ ड आणि आयटी अॅक्ट २००८ याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.