उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, की मुंबईचे? - अतुल भातखळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, की मुंबईचे? भाजपचा सवाल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मात्र, आजारी असल्याचं सांगत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान आज मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) कार्यक्रमाला ठाकरे यांनी हजेरी लावली, याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांचा सवाल केला आहे.

प्रकृतीच्या कारणामुळे काल महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारणारे मुख्यमंत्री आज महापालिकेच्या बैठकीला उपस्थित होतात? हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की मुंबईचे आहेत? असा खडा प्रश्न अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसेच ऐंशी हजार कोटीचे डिपॉझिट असलेल्या मुंबई महापालिकेने करोना काळात एका दमडीची ही मदत केली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना चोख प्रत्युत्तर देईल असे देखील भातखळकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा: शाकाहारामुळे सेक्सवर काय परिणाम झाला?, महिला पत्रकाराने सांगितला अनुभव

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. अजूनही कोरोनाचे संकट टळलेलं नाही. याकाळात मुंबई महापालिकेनं काम केलं आहे. याचं थेट न्यूयॉर्क आणि सर्वोच्च न्यायालयानं कौतुक केलं आहे. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही. कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो असे ते या वेळी म्हणाले.

हेही वाचा: पेन्शनधारकांसाठी गुड न्युज, घरबसल्या जमा करता येणार जीवन प्रमाणपत्र

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top