Laxman Jagtap Death : 12 दिवसांत भाजपने गमावले 2 आमदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laxman Jagtap Death

Laxman Jagtap Death : 12 दिवसांत भाजपने गमावले 2 आमदार

चिंचवड : चिंचवड येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते मागच्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. तर भाजपने मागच्या १२ दिवसांत दोन आमदार गमावले आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले आहे.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

दरम्यान, भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोघेही मागच्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. मुक्ता टिळक या कॅन्सरग्रस्त होत्या. त्या मागच्या बऱ्याच दिवसांपासून उपचार घेत होत्या. त्याचबरोबर लक्ष्मण जगताप यांनासुद्धा अनेकवेळा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा: Laxman Jagtap passes away : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकिर्द

१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.