esakal | ...नाहीतर तुमचं पार्सल तालिबानकडे पाठवू, नितेश राणेंचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane

...नाहीतर तुमचं पार्सल तालिबानकडे पाठवू, नितेश राणेंचा इशारा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अलीकडेच प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहा (naseeruddin shah) यांनी तालिबान्यांचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर (indian muslim) सडकून टीका केलीय. नसरुद्दीन शहा यांनी घेतलेल्या या भूमिकेच कणकवलीचे भाजपा आमदार (Bjp mla) नितेश राणे (nitesh rane) यांनी समर्थन केलं आहे. भारतातून राहून तालिबानचं समर्थन करणाऱ्यांना नितेश राणे यांनी थेट इशाराच दिला आहे.

काय म्हटलय नितेश राणे यांनी?

"नसरुद्दीन शहा यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. भारतात राहून काही मोजके जण तालिबानचं समर्थन करताना दिसतात. यांनी मूळात इस्लाम समजून घेण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर यांचं पार्सल तालिबानकडे पाठवण्याची तयारी आणि क्षमता आमच्यामध्ये आहे. भारतात रहायचं असेल आणि तालिबानचं समर्थन करत असाल, तर एक मिनिट पण इथे राहू देणार नाही ही आमची भूमिका आहे" असे नितेश राणे यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आली असून भारतात राहणाऱ्या काही मुस्लिमांनी तालिबानचं समर्थन केलं आहे.

हेही वाचा: प्रेमासाठी काय केलं? पत्नी, मुलांची हत्या करुन तळघरात पुरले मृतदेह

नसरुद्दीन शहा काय म्हणाले?

नसरुद्दीन शहा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याची चर्चा सगळीकडे आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "भारतातील मुस्लिम हा पूर्णपणे वेगळा आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या सगळ्या जगाला अफगाणिस्तानविषयी सहानुभूती आहे. मात्र काही भारतीय मुस्लिम हे त्या तालिबान्यांचे समर्थन करताना दिसत आहे. हे चूकीचं आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, त्यांना आधुनिक काळाशी सुसंगत असं मुस्लिम तत्वज्ञान हवं आहे की, अराजकीय स्वरुपात सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला बेचिराख करुन टाकणारे विचार हवे आहेत. याचा बारकाईनं विचार करण्याची गरज आहे"

हेही वाचा: कमी वयात हार्ट अटॅक येण्याची ही आहेत कारणे

भारतीय मुस्लिम हा जगातील इतर मुस्लिमांपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे. सर्वात शेवटी मी अशी प्रार्थना करतो की, "भारतीय मुस्लिम हा कधीही अशाप्रकारच्या बदलाकडे जाता कामा नये. आपण त्याला ओळखू शकणार नाही. इतक्या वेगळया प्रकारानं तो बदलणार नाही याची काळजी घ्यायला हवी" अशी प्रतिक्रिया नसरुद्दीन शहा यांनी दिली आहे.

loading image
go to top