Subhash Deshmukh | महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे, भाजप आमदाराची थेट अधिवेशनात तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bjp Mla Subhash Deshmukh Complaint About Molestation By Showing Naked Women Paperweight

महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे, भाजप आमदाराची थेट अधिवेशनात तक्रार

पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस चांगलाच गाजला. अनेक वादग्रस्त मुद्दे आज उपस्थित करण्यात आली आहे. दरम्यान, सुभाष देशमुख यांनी संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून चाळे करत असल्याची तक्रार केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे असी मागणीदेखील त्यांनी केली.(Bjp Mla Subhash Deshmukh Complaint About Molestation By Showing Naked Women Paperweight)

अधीक्षक कार्यकारी अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याला वारंवार बोलावून हे पेपरवेट दाखवतो. तसेच या पेपरवेटवरून टिंगल करतो आणि अश्लील चाळे करतो, या तक्रारीचा मुद्दा अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मांडण्यात आला.

तसेच, या महिलेने जानेवारी-फेब्रुवारीपासून हे चाळे सुरू असताना नाईलाजाने आता तक्रार दाखल केली आहे. याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं,” अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली.

या अधिक्षकाचे नाव अभियंता प्रविण मारुतीराव दरोली आहेत. त्याने त्याच्या कार्यालयात नग्न महिलेचं चित्र काढलेलं पेपरवेट ठेवलं आहे. त्या ठिकाणी महिला अधिकारीही आहेत.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संबंधित तक्रारीची नोंद घ्यावी आणि कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.

Web Title: Bjp Mla Subhash Deshmukh Complaint About Molestation By Showing Naked Women Paperweight

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..