विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून भाजपने केली 'या' नेत्याची निवड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

नागपूरमध्ये आजपासून (सोमवार) हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाआघाडी सरकारची कसोटी लागणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारला स्थगिती सरकार असे म्हटले आहे.

नागपूर : विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी भाजपने प्रवीण दरेकर यांची निवड केली आहे. आमदार सुरजीतसिंह ठाकुर यांचे नाव अचानक मागे पडून दरेकर यांचे नाव पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागपूरमध्ये आजपासून (सोमवार) हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाआघाडी सरकारची कसोटी लागणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारला स्थगिती सरकार असे म्हटले आहे. आता विधान परिषदेत सरकारला घेरण्याची भाजपने तयारी सुरु केली असून, दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदार सरकारवर टीका करताना दिसणार आहे.

फडणवीसांनी गृहखात्याच्या माध्यमातून सरकार टिकवले : शिवसेना

सुरजीतसिंह ठाकुर यांच्या नावाला पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी संमती दिल्याचे सांगण्यात येत होते. पण, अचानक दरेकर यांचे नाव पुढे आले. विरोधी पक्षनेत्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतील मेळावा. त्याची राज्यभर झालेली चर्चा यामुळे निवडीचा विषय मागे पडला होता. आता ही निवड झाली आहे.

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MLC Pravin Darekar elected as opposition leader in legislative assembly