‘भाजप-मनसे युती सध्या तरी असंभव’

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 10 January 2020

भाजप आणि मनसे यांची युती सध्या तरी असंभव असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांची युती होणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई - भाजप आणि मनसे यांची युती सध्या तरी असंभव असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून भाजप आणि मनसे यांची युती होणार याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यानंतर राज्यात नवे राजकीय समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. राज ठाकरे यांच्याशी भेटीबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, की आमची अनेकदा भेट झाली आहे. सध्यातरी मनसेसोबत युतीची शक्‍यता नाही. मनसे आणि भाजपच्या विचारात आणि कार्यपद्धतीत अंतर आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी प्रभादेवी परिसरातील हॉटेल इंडिया बुल्स स्कायमध्ये गुप्त बैठक झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजते. भविष्यात कोणत्याही पक्षासोबत राजकीय समीकरणे जुळू शकतात, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-MNS alliance is impossible at present devendra fadnavis