

पुणे: वर्ध्याचे (vardha) भाजपा खासदार रामदास तडस (bjp mp ramdas tadas) यांच्या सुनबाईने सासरकडच्या मंडळींवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. सासरकडची मंडळी मारहाण करत असल्याचा आरोप तिने केलाय. राष्ट्रवादीच्या (ncp) महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) पूजाच्या मदतीला धावून गेल्या आहेत. त्यांनी या संदर्भातला व्हिडीओ टि्वटरवर पोस्ट केला आहे.
"आज मला माझ्या मोबाइलवर एक व्हिडीओ आला. रडण्याचा आवाज येत होता. मी पूजा बोलतेय. मला मदतीची गरज आहे. मला इथून बाहेर काढा. अन्यथा माझ्या जीवाला धोका आहे. अशा स्वरुपाचा तो व्हिडीओ होता" अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. "पूजा माझ्याशी बोलत होती. माझ्या जीवाला धोका आहे. मला त्रास होतोय. मी आज पोलीस स्टेशनला जाणार होते. पण मी तिथपर्यंत पोहोचू नये, यासाठी तडस कुटुंबीय माझ्यावर जीवघेणा हल्ला करु शकतात" असं तिने सांगितल्याचं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
"पूजाचा व्हिडीओ मिळाल्यानंतर मी लगेच पोलिसांशी संपर्क साधला. माझ्या महिला पदाधिकाऱ्यांशी बोलले. पूजा जिथे आहे, तिथे पोलीस आणि महिला पदाधिकारी पोहोचल्या आहेत. पोलिसांची तिला संरक्षण देण्याची जबाबदारी आहे" असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.
"रामदास तडस यांचे कुटुंबीय घरच्या सुनेला प्रचंड त्रास देत होते. ती तणावाखाली आहे. पोलीस प्रशासनाने आरोपींविरोधात कारवाई करावी. रामदास तडस केंद्रात खासदार म्हणून काम करतात. घरातल्या सुनेसोबत असे वागत असाल, तर हे निंदयनीय आहे" असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.