स्मारकांवरून मोदीवर टीका करतानाचा सुजय विखेंचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

भाजप आणि शिवसेनेत सध्या काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. यामुळे आता ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप-शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांना सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, नेत्यांची एकमेकांवर टीका होत असताना पक्षांतर केलेल्या राजकीय नेत्यांच्या पूर्वीच्या भाषणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ नगरचे खासदार सुजय विखे पाटील यांचा व्हायरल होत आहे.

भाजप आणि शिवसेनेत सध्या काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. यामुळे आता ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप-शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांना सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आले आहेत. आता सुजय विखेंच्या व्हायरला होत असलेल्या व्हिडिओमुळे भाजपची गोची झाली आहे. यामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत भाजप सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहेत. सुजय विखे पाटील काँग्रेसमध्ये असतानाचा हा व्हिडीओ आहे. त्यात ते म्हणतात की, 36 महिन्यात गुजरातमध्ये 3300 कोटी रुपयांचे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा केला जाऊ शकतो. तर जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवछत्रपतींचे स्मारक आणि भूमिपुजन करुनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप का उभारण्यात आले नाही असा सवाल ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करताना दिसत आहेत. विरोधी पक्षांकडून त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Sujay Vikhe Patil video viral on social media