
छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून...; निलेश राणेंची टीका
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या उमेदवारीबाबत राज्यात वातावरण तापताना दिसत आहे. कारण शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावाची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घोषणा केली आहे. दरम्यान सेनेकडून खासदार संभाजी राजेंना (Sambhaji Raje) उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी ट्वीट केले आहे, ते म्हणाले की, "राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उमेदवारी दिली. छत्रपती संभाजी मातोश्रीवर गेले नाहीत म्हणून त्यांना उमेदवारी नाही, हा राजघराण्याचा अपमान आहेच पण शिवसेना किती खालच्या थराला जाऊन घाणेरडे राजकारण करणारा पक्ष आहे हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलं" असा आरोप केला आहे.
दरम्यान शिवसेनेच्या ऑफरकडे संभाजी राजेंनी पाठ फिरवली होती. पण आता कोल्हापुरातल्या शिवसेना नेत्याचा विचार केला जात असल्याने संभाजीराजेंनी लवकर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे बोलले जात होते.
हेही वाचा: राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर संजय पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..
तत्पूर्वी, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, संजय पवार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. लवकरच याची अधिकृत घोषणा करण्यात येईल. संजय पवार हे शिवसेनेचे पक्के मावळे आहेत. राज्यसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. सहाव्या जागेचा चॅप्टर आता बंद झाला आहे. संभाजी राजेंचा आम्ही नक्कीच सन्मान ठेवतोय, त्यासाठीच त्यांना शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव आम्ही ठेवला. पण त्यांना अपक्ष लढायचं आहे, निवडून येण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ही मतं असतील तर त्यांना त्यांना निवडून द्यावं.
हेही वाचा: 'रावणापेक्षाही राज ठाकरेंकडून उत्तर भारतीयांवर जास्त अत्याचार'
Web Title: Bjp Nilesh Rane Slams Shivsena Over Sambhaji Raje Rajya Sabha Nomination
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..