उमेश कोल्हेनंतर आणखी एका हिंदूवर..; नितेश राणेंच्या ट्वीटने खळबळ

या बद्दल राणे उद्या दिपारी पत्रकार परिषदेत खुलासा करणार आहेत
BJP Nitesh rane tweeted After Umesh Kolhe case in Amaravati one more Hindu was attacked
BJP Nitesh rane tweeted After Umesh Kolhe case in Amaravati one more Hindu was attacked

मुंबई : भाजपच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मा च्या विधानाचे समर्थन केल्याप्रकरणी अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती, या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कडून चौकशी करण्यात येत आहे, या दरम्यान भाजप नेते नितेश राणे यांनी दावा केला आहे. अमरावतीमधील उमेश कोल्हे प्रकरणानंतर महाराष्ट्रात आणखी एका हिंदूवर हल्ला झाला असल्याचे राणे म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.

नितेश राणे यांनी ट्वीट केलं आहे की, "अमरावतीमधील उमेश कोल्हे प्रकरणानंतर.. महाराष्ट्रात आणखी एका हिंदूवर हल्ला झाला.. याबद्दल माहिती उद्याच्या पत्रकार परिषदेत देऊ.. दुपारी 1 वाजता भाजप मुख्यालय नरिमन पॉइंट. जय श्री राम". राणे यांनी केलेल्या या ट्वीटनंतर ते कोणता गोप्यस्फोट करणार आहेत याबद्दल तर्क लढवले जात आहेत.

BJP Nitesh rane tweeted After Umesh Kolhe case in Amaravati one more Hindu was attacked
मंत्रीमंडळ विस्तार केला असता तर CM आजारीच पडले नसते; अजित पवारांची टोलेबाजी

अमरावतीतील उमेश कोल्हे यांची गेल्या २१ जूनच्या रात्री गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दुसऱ्या दिवशी दोन आणि त्यानंतर अन्य पाच आरोपींना अटक केली. तसेच या घटनेचा तपास देखील एनआयए (NIA) कडे सोपवला होता. दरम्यान या प्रकरणी काल मुर्शिद अहमद अब्दुल रशीद (४१, रा. ट्रान्सपोर्ट नगर) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (२३, लालखडी), या आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याआधी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) तसेच सूत्रधार शेख इरफान शेख रहीम (३५) यांना अटक केली आहे.

BJP Nitesh rane tweeted After Umesh Kolhe case in Amaravati one more Hindu was attacked
Emergency Landing : वाराणसी-मुंबई विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com