
मंत्रीमंडळ विस्तार केला असता तर CM आजारीच पडले नसते; अजित पवारांची टोलेबाजी
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार येऊन एक महिनाभरापेक्षा जास्त वेळ उलटला असून देखील अद्याप राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळालेला नाही, यारुन विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकरवर सतत टीका केली जात आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून जोरदार फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले की, एक महिन उलटून गेला तरी मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाहीये, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दोघेच राज्याचा कारभार करतायत, त्यामुळं राज्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत. त्यांच्यावर इतका भार आला आहे की मुख्यमंत्री आजारी पडत आहेत, मी चांगल्या भावनेनं म्हणतोय, राजकारण आणत नाही, तुम्ही बाकीच्या ४०-४२ लोकांचं मंत्रीमंडळ केलं असतं तर कामाची वाटणी झाली असती. जो तो पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यात काम करत राहीला असता, असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर निशाणा साधला, यांनी ४० आमदारांना घेऊन जात असताना सगळ्यांनाच मंत्री करतो असं सांगितलेलं असू शकतं असं पवार म्हणाले. मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी भाजपच्या १०६ आमदारांना देखील वाटत असेल की आपल्यालाही मंत्रीपद मिळावं, एकतर त्यांना मुख्यमंत्री पद नसल्याने त्यांचे चेहरे पडलेले असतात, असा टोला देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी लगावला.