esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

ठाकरे सरकार जागा देईल तिथं गुंतवणुकीस तयार - गडकरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे. विकासासाठी रोजगार महत्वाचा आहे. आपल्या देशात विकास आणायचे असतील तर उद्योजक रस्ते, वीज आणि पाणी या गोष्टींचा विचार करतो. उद्योग आला तर स्वाभाविकपणे भांडवली गुंतवणूक येते. आणि भांडवली गुंतवणूक आली की रोजगार उपलब्ध होतो. या देशातील गरिबी, भूकमारी संपवायची असेल तर रोजगार उपलब्ध करावे लागतील, असं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले. ते अहमदनगरमध्ये लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र सरकार ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही गुंतवणूकीस तयार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी या दोन मातब्बर नेत्यांसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. शनिवारी (दोन ऑक्टोबर) रस्तेकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी शरद पवार आणि नितीन गडकरी एका मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी अनेक विषयावर आपले मत मांडले.

नितीन गडकरी आपल्या भाषणात काय म्हणाले?

विकासात रस्ते महत्वाची भूमिका बजावतात.

आपल्या देशात उद्योग आणायचे असतील तर रस्त्याचं जाळे महत्वाचं असते.

देशातील गरिबी दूर करण्यासाठी रोजगार हवा, रोजगारासाठी रस्ते, वीज आणि पाणी याची सोय हवी.

रस्त्याचं जाळ वाढवण्याचा प्रयत्न

नगरच्या साखर कारखाण्यामुळे विकास

महाराष्ट्र सरकार ज्या ठिकाणी जागा देईल तिथे आम्ही गुंतवणूकीस तयार आहोत.

कारखाण्याचं गणित बिघडलं तर शेतकरी देशोधडीला लागतील.

देशात 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या हव्यात

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी इथेनॉल तयार करावेत. शेतकऱ्यांना फायदा होईल.

माझं महाराष्ट्रासोबत जवळचं नातं. जवळपास 20 वर्ष राज्याच्या राजकारणात कार्यरत होतो.

इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त

साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचं शोषण करु नये

देशात कोणत्याही धान्यापासून इथेनॉल तयार करण्यास परवानगी

मोठ्या कंपन्यांना यापुढे प्लेक्स इंजिनच्या गाड्या तयार कराव्या लागतील.

साखर कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती करण्याची परवानीग द्यावी

इथेनॉल हा पेट्रोलचा उत्तम पर्याय

पेट्रोलऐवजी इथेनॉलच्या गाड्या हव्यात

इथेनॉलचे पंप सुरु करावेत

गाईचा गर्भ ट्रान्सप्लान्ट करण्याबाबतचं संशोधन सुरु आहे. दुग्दोउत्पादन वाढवण्यासाठी नवीन संशोधन गरजेचं आहे.

इथेनॉल तयार करा, साखर नको - कारखानदारांना गडकरींचं आवाहन

loading image
go to top