Eknath Shinde: कैकेयीची भूमिका घेऊ नका, राजधर्म पाळा; भाजप आमदाराची मुख्यमंत्री शिंदेंना विनंती

आज ओबीसींचा एल्गार मेळावा आज पंढरपूर येथे पार पडला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकनाथ शिंदे यांना राजधर्माची आठवण करुन दिली.
Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde: राज्यात मराठा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला. हा विरोध दर्शवण्यासाठी ओबीसी नेते राज्यभर सभा घेत आहेत. आज ओबीसींचा एल्गार मेळावा आज पंढरपूर येथे पार पडला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकनाथ शिंदे यांना राजधर्माची आठवण करुन दिली.

गोपीचंद पडळकर म्हणाले, महाराष्ट्र सरकार ओबीसींनी वनवासात पाठवणार आहे का? ओबीसींसंदर्भात सरकार ठाम भूमिका का घेत नाहीत. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती आहे कैकेयीची भूमिका घेऊ नका, राजधर्म पाळा. राजधर्मामध्ये धर्म आहे आणि धर्म कर्माशी संबंधित आहे. जो नीतिने वागेल त्याला चांगले कर्म मिळतात. राजधर्म आणि कर्म भारता श्रीकृष्णानी दिला. त्याच श्रीकृष्णाचा अवतार पंढरीच्या पांडरुंगाच्या नगरीत आज मेळावा होत आहे.

पंढरीचा पांडुरंग छगन भुजबळ यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहायची आपली जबाबदारी आहे. ३४६ जातींच्या हक्काचा प्रश्न आहे. हा महाराष्ट्रातील धनगर आता धाडस करणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसींच्या रक्षणाची आपली जबाबदारी असल्याचे पडळकर म्हणाले.

Eknath Shinde
Ajit Pawar : ''बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं'', रोहित पवारांच्या 'त्या' टीकेला अजितदादांचं उत्तर

गोपीचंद पडळकर म्हणाले, प्रस्थापितांसोबत भांडण केली, महाराष्ट्रातील जेलचा डाटा काढला तर उपेक्षीतांची, वंचितांची पोरं या प्रस्थापितांसाठी पिढ्यानपिढ्या जेलमध्ये आहेत. हे आता थांबवलं पाहिजे. आपण आता आपल्यासाठी लढलं पाहिजे. एकत्र एवून आपल्या हक्काचं आणि अधिकाराचं संरक्षण आता आपल्याला करायचं आहे. कुणीही आपल्या मदतीला येणार नाही.

एका बाजुला ओबीसीला धक्का लावायचा नाही बोलायचं अन् दुसऱ्या बाजुला कुणबी प्रमाणपत्र वाटायचं, असं राज्यात सुरु आहे. संविधानात हा अधिकार नाही. शिंदे समिती बरखास्त करा. तसेच जे प्रमाणपत्र वाटलेले आहेत. त्या प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढा. ओबीसींना त्यावर हरकत घेण्याचा अधिकार आहे. मग कळेल खोटी आणि खरं प्रमाणपत्र कोणती?, असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. 

Eknath Shinde
Sharad Mohol Dead: शरद मोहोळ हत्याप्रकरणात ६ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी तर वकिलांना...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com