Pankaja Munde: "भाजप पक्षाने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांना वापरून बाजूला केलं" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde

Pankaja Munde: "भाजप पक्षाने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांना वापरून बाजूला केलं"

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांना इतर पक्षाकडून त्यांना ऑफरही देण्यात आल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच पंकजा मुंडे यांना वारंवार डावल्याच्या चर्चा सुरू असतात. अशातच आता पंकजा मुंडे यांच्यासोबतच आणखी काही महत्वाच्या नेत्यांचा वापर करुन घेतल्याची टीका ठाकरे गटाच्या नेत्याने केली आहे.

भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं आहे. यामध्ये लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सदाभाऊ खोत, राजु शेट्टी, महादेव जानकर या नेत्यांचा वापर करुन भाजपने त्यांना बाजूला केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे काल अहमदनगर दौऱ्यावर होत्या, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं आहे. केंद्रीय राजकारणापासून ते महाराष्ट्रातील राजकारणापर्यंत असे अनेक नेते आहेत ज्यांना भाजपने वापरून घेतलं आणि बाजूला केलं. या नेत्यांच्या वोट बँकेचा भाजपने पुरेपूर वापर करून घेतला त्याचबरोबर अनेकांनी आश्वासनं दिली. अनेकांनी तात्पुरती मंत्रीपद ही दिलं. मात्र त्यानंतर अलगद बाजूला काढून टाकलं. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा असल्याचंही सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.

तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 2014 मध्ये वंजारी बेल्टमध्ये पंकजा मुंडे यांना फिरवलं त्यानंतर आता त्यांना बाजूला करण्यात आलं. विनोद तावडे जरा हुशार ठरले. तावडे देवेंद्र भाऊंच्या तावडीतून सुटले. तावडे आता केंद्रात आपल स्थान निर्माण करू पाहत असल्याचंही अंधारे म्हणाल्यात.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आता बोललेच पाहिजे. त्यांची अशी अवस्था म्हणजे अवघड जागेच दुखणं झालं आहे. त्यांना आता बोलता पण येईना आणि दाखवता पण येईना अशी अवस्था झाली आहे. केंद्रीय राजकारणाचा विचार केला तर लालकृष्ण आडवाणी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य भाजपसाठी खर्च केलं. त्या आडवाणींना देखील भाजपने बाजूला केलं. तर सुषमा स्वराज्य यांचा शेवटचा काळ मोदी शहा यांनी वेदनादायी केला. तोच कित्ता देवेंद्र फडणवीस गिरवत असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.

तर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींना वापरून घेतलं. नंतर त्यांची संघटना फोडली. सदाभाऊ खोत यांना तात्पुरत राज्यमंत्री पद दिलं. नंतर सोडून दिलं. आता सदाभाऊंना आम्ही विचारलं सदाभाऊ कुठं आहात? तर ते म्हणत आहेत, म्हशीच्या धारा काढतोय. तीच परिस्थिती महादेव जानकर यांची देखील केली आहे. महादेव जानकर यांना वापरून घेतलं. धनगर मत पदरात पाडून घेतली आणि त्यांना बाजूला केलं. तसच ते आता बच्चू कडू यांच्याबद्दल करत आहेत. राणा दाम्पत्याला हाताशी धरून ते बच्चू कडू यांचा गेम करू पाहत असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.