भाजपच्या अंगी पुन्हा बळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार पाडून भाजपच्या गोटात पळालेल्या १५ आमदारांपैकी बारा जणांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे सरकार तरले आहे.

मुंबई - कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार पाडून भाजपच्या गोटात पळालेल्या १५ आमदारांपैकी बारा जणांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे भाजपचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे सरकार तरले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

कर्नाटकातील या यशाने राज्यातील भाजपचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही. या आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांतील नाराजांना गळाला लावून त्यांना पोटनिवडणुकीत विजयी करण्यासाठीचे नियोजन राज्य सरकारकडून आखले जात आहे. पक्ष पातळीवर तशी चर्चाही सुरू झाल्याचे बोलले जाते. 

राणे यांना पनवती म्हणणे अयोग्य

भाजपने आढावा बैठकांचे सत्र सुरू केले आहे. राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या तर स्वबळावर सरकार स्थापन करता यावे, यासाठी तयारी हवी, असे भाजपचे म्हणणे आहे. राज्यात सर्वांत जास्त १०५ आमदार निवडून आल्यानंतरही सरकार स्थापन करू शकलेले नाही याचे शल्य भाजपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना गळाला लावून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले; मात्र बहुमताभावी या सरकारला पायउतार व्हावे लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारही लवकरच गडगडेल,  असा विश्‍वास भाजपच्या नेत्यांना वाटत असून, भाजपचे प्रवक्‍ते वारंवार याबाबत माध्यमांशी बोलत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Power increase by karnataka result