बहुमत चाचणीनंतर अमित शहा आता महाराष्ट्रात!

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

- बहुमत चाचणी झाली आता अमित शहा मुंबईत.

मुंबई : महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी आज (शनिवार) झाली. यामध्ये उद्धव ठाकरे यशस्वीही झाले. त्यानंतर आता काही तासांतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महाविकासआघाडी सरकारची बहुमत चाचणी आज पूर्ण झाली. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केले. इतर चार आमदारांनी तटस्थ राहण्याची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांचे सरकार बहुमत चाचणीत पास झाल्यानंतर अमित शहा राज्यात दाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. बहुमत चाचणीनंतर अवघ्या काही तासांतच अमित शहा मुंबईत दाखल झाल्याने अनेक राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. 

दरम्यान, मुंबईत एका वृत्तपत्राचा कार्यक्रम सायंकाळी साडेपाचच्या सुमारास होणार आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा मुंबईत आल्याची माहिती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP President Amit Shah reached on Mumbai Airport