

BJP State Chief Ravindra Chavan Apologises Over Vilasrao Deshmukh Remark
Esakal
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधील पुसल्या जातील असं वधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. विलासराव देशमुख यांचे सुपूत्र अमित देशमुख, रितेश देशमुख आणि धीरज देशमुख यांनीही रविंद्र चव्हाण यांचा समाचार घेतला. दरम्यान, वाद वाढत चालल्याचं दिसताच रविंद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.