Maharashtra Politics: चंद्रशेखर बावनकुळे व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात बंद दारा आड चर्चा; काय आहे कारण?

Maharashtra Politics: बावनकुळे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये काल बंद दारा आड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीचे मेळावे ठिक-ठिकाणी आयोजित करण्यात आले असून त्याची रणनिती ठरवण्यासाठी दोघं भेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal

आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. गाठीभेटी, मतदारसंघातील दौरे, सभा, जागावाटपांच्या चर्चा या घडामोडींना वेग आला आहे. काल (बुधवारी) महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून एकूण मतदानात महायुतीचा वाटा ५१ टक्क्यांपेक्षा जास्त राहणार असल्याचा विश्वास महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दारा आड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीचे मेळावे ठिक-ठिकाणी आयोजित करण्यात आले असून त्याची रणनिती ठरवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या मेळाव्यातून नागरिकांना कोणत्या मुद्यांवर साद घालायची, कुठल्या मंत्र्यांवर कुठली जबाबदारी सोपवायची याचीही चर्चा झाल्याची माहिती आहे. ही बैठक रात्री उशिरी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाजू शकतं तत्पूर्वी महायुतींकडून हालचालींना आता वेग आला आहे.

Maharashtra Politics
Weather Update: छत्री, रेनकोट सोबत ठेवा! पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट

‘महायुती’ चे १४ तारखेला राज्यभर मेळावे

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर, १४ जानेवारी रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यांत ‘महायुती’तील ११ पक्षांचे संयुक्त मेळावे होणार आहेत. जिल्हा मेळाव्यांना घटक पक्षांचे जिल्हा पातळीवरील प्रमुख नेते, पालकमंत्री तसेच घटक पक्षांनी नेमलेले संपर्कमंत्री उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरीय मेळाव्यानंतर तालुका आणि बूथस्तरीय मेळावे घेण्याचा निर्णय ‘महायुती’ने घेतला आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विभागीय स्तरावर मेळावे होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री, घटक पक्षांतील नेते या मेळाव्यांना उपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Politics
Corona News: राज्यात आढळले कोरोनाचे तब्बल इतके रुग्ण; नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

तटकरे यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यासह ‘महायुती’तील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतील समन्वय वाढावा, यासाठी हे मेळावे होणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत साकारण्यासाठी ‘महायुती’चे सर्व नेते, कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत, असे तटकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी ‘महायुती’च्या घटक पक्षांचे मेळावे होणार आहेत. गाव पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण होण्यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. असे शिवसेना(शिंदे गटाचे) मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Maharashtra Politics
मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची मतदार यादी २२ जानेवारीला होणार अंतिम; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना असणार इलेक्शन ड्यूटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com