Maharashtra Politics: पेडणेकरांच्या 'त्या' वक्तव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले माझी अक्कल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics: पेडणेकरांच्या 'त्या' वक्तव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले माझी अक्कल...

Maharashtra Politics: पेडणेकरांच्या 'त्या' वक्तव्यावर बावनकुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाले माझी अक्कल...

मंगळवारी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बावणकुळे यांच्यावर टीका केली होती. नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं. असा टोमणा किशोरी पेडणेकरांनी लगावला होता. त्यावर आता बावणकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावणकुळे म्हणाले की, किशोरी पेडणेकर असतील किंवा चंद्रकांत खैरे, शिवसेनेच्या नेत्यांची अवस्था सध्या फार वाईट आहे. त्यामुळे असे लोक माझी अक्कल काढतील, बुद्धी काढतील. त्यामध्ये मला फारसं वाईट वाटत नाही. अशी . एक वेळ येईल की त्यांना त्यांची अशी वक्तव्य बंद करावी लागतील, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जेव्हा जनाधार कमी होतो. माणसं तुटत जातात. संघटन कमी होतं जात. तेव्हा अशी वक्तव्य येतात. माझी अक्कल काढतील, बुद्धी काढतील. याच मला काही वाईट वाटत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू निसटलेली आहे. येत्या काही दिवसात एक वेळ अशी येईल की, विरोधकांना त्यांची वक्तव्य बंद करावी लागतील.

नंदूरबारमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. काल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार टीका केली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता पक्षात नसेल. पक्षातील सगळे नेते शिंदे गटात येतील, काही दिवसांपूर्वी असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं. त्यालाच उत्तर देताना पेडणेकरांनी जोरदार टीका करत नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं असा टोमणा मारला होता.