
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? हा प्रश्न सर्वाच्या मनात आहे. काहींच्या मते निवडणुका ऑक्टोंबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट उत्तर दिले आहे. तसेच या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले आहे.