प्रदेशाध्यक्षपदासाठी हळवणकरांचे नाव पुढे!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जुलै 2019

मुंबई अध्यक्षांचाही शोध होणार
मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून मंत्री आशिष शेलार यांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सलग दोन वेळा या पदाला योग्य न्याय दिला आहे. तिसऱ्या खेपेस त्यांना संधी मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून तरतूद करावी लागणार आहे. तरीही या पदासाठी खासदार मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग आळवणी आदींची नावे चर्चेत आहेत.

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते. 

विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. या पदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू असली, तरीही इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. सुजितसिंह ठाकूर, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावांचीही चर्चा आहे. तरीही हळवणकर यांना श्रेष्ठींनी शब्द दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई अध्यक्षांचाही शोध होणार
मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून मंत्री आशिष शेलार यांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सलग दोन वेळा या पदाला योग्य न्याय दिला आहे. तिसऱ्या खेपेस त्यांना संधी मिळण्यासाठी विशेष बाब म्हणून तरतूद करावी लागणार आहे. तरीही या पदासाठी खासदार मनोज कोटक, आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग आळवणी आदींची नावे चर्चेत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP State President suresh halvankar Politics