
BJP
esakal
सकाळ वृत्तसेवा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उमेदवारांचा शोध घेण्याची जबाबदारी निवडणूक संचलन समितीकडे देण्यात आली आहे. समितीला जिल्हा परिषद गटासाठी पाच तर पंचायत समिती गणासाठी प्रत्येकी दोन नावे मागितली आहेत. दिवाळीनंतर होणार्!या कोअर कमेटीच्या बैठकीत या नावावर चर्चा होणार आहे.