राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा; भाजपाचं उपराष्ट्रपतींना पत्र

पत्रात संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करण्याची विनंती केली आहे.
राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा; भाजपाचं उपराष्ट्रपतींना पत्र

संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या आणि त्याचा मुलगा निल सोमय्या हे दोघेही जेलमध्ये जाणार असल्याचं सूचक वक्तव्यही त्यांनी ट्वीटद्वारे केलं आहे. यावर सोमय्यांनी (Kiriti Somaiya) पत्रकार परिषदे घेत उत्तरही दिलं आहे. दरम्यान, आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (bjp Tushar Bhosale) यांनी केली आहे.

राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा; भाजपाचं उपराष्ट्रपतींना पत्र
मला जोड्याने मारा...किरीट सोमय्यांनी ऐन पत्रकार परिषदेत काढली चप्पल!

संजय राऊत यांच्या भाजपाचे साडेतीन नेते रडावर असल्याच्या विधानानंतर भाजपा नेत्यांकडून त्यांच्यावर टीका चालु आहे. (tushar bhosale letter to vice presendent) दरम्यान, भाजपाचे आचार्य तुषार भोसले उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहुन मागणी केली आहे. यात संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करण्याची विनंती केली आहे. पत्रात आचार्य भोसले म्हणतात, पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु-संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य, या संवैधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, आता या मागणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ठराविक लोकांना कंत्राटं मिळाली. एस.नरवर या व्यक्तीचा उल्लेख केला. नरवर यांचा दुधाचा व्यवसाय आहे. भाजपाचं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर या व्यक्तीचा राज्यात वावर वाढला आणि पाच वर्षात त्याची संपत्ती 700 कोटींवर गेल्याचा आरोप राऊत यांनी केला. राऊत यांना पत्रकार परिषदेनंतर साडेतीन नेत्यांची नावं विचारण्यात आली. मात्र, त्यांनी ही नावं उद्यापासून समोर येणार असल्याचं सांगितलं आहे.

राऊतांना राज्यसभेतून निलंबित करा; भाजपाचं उपराष्ट्रपतींना पत्र
"ED च्या धमक्या देत शेकडो कोटी गोळा केले, सोमय्या जेलमध्ये जाणार"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com