
"ED च्या धमक्या देत शेकडो कोटी गोळा केले, सोमय्या जेलमध्ये जाणार"
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा एकदा संजय राऊत देखील माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी सोमय्यांनी फक्त आपले बंगले दाखवून द्यावेत असं म्हटलं. ED च्या धमक्या देत शेकडो कोटी गोळा केले, सोमय्या (Kirit Somaiya) जेलमध्ये जाणार असंही राऊत म्हणाले. दुसऱ्यांना धमक्या देऊन जेलमध्ये पाठता, आता तुम्ही जा. असं त्यांनी म्हटलं आहे. अर्जून खोतकरांना ईडीने कसा त्रास दिला हे आम्हाला माहितीये. सोमय्या आणि राऊत (Sanjay Raut) यांच्या या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघालं आहे. (Sanjay Raut Serious allegations on Kirit Somaiya)
सुजित नवाब नावाचा एक प्लॉट आहे, तो प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र बिल्डर अमित देसाई यांनी १०० कोटींपेक्षा जास्त किमतीचा प्लॉट ईडीच्या नावानं धमक्या देत तो कवडीमोल भावात आपल्या नावावर करून घेतला. त्यानंतर त्यांनी त्यातले १५ कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावं अन्यथा आपण त्याचं नाव घेऊ असं संजय राऊत म्हणाले. तसंच पुढे ते म्हणाले की, सोमय्यांच्या आरोपानंतर पुरावे दाखवायला ते कोण आहेत? तपास अधिकारी आहेत का? असा सवाल त्यांनी केला. काल आपण जे प्रश्न विचारले त्याची उत्तर द्यावी असं राऊत म्हणाले.
हेही वाचा: मला जोड्याने मारा...किरीट सोमय्यांनी ऐन पत्रकार परिषदेत काढली चप्पल!
संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोमय्यांनी काही वेळापूर्वीच दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकर यांचे अलिबागमधील १९ बंगल्याचे कनेक्शन सोमय्यांनी बाहेर काढले होते. यासंबंधी त्यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरेंनी भरलेल्या मालमत्तेच्या पावत्या सादर केल्या. तसंच त्यांनी माझे आरोप खोटे निघाल्यास मला जोड्याने मारा असंही म्हटलं आहे.
हेही वाचा: दलाल सोमय्या ते ९ कोटींचा गालिचा; राऊत यांच्या 'ट्रेलर'मधील ७ महत्वाचे मुद्दे
Web Title: Sanjay Raut Allegations On Kirit Somaiya And Family Ed Extortion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..