Sharad Pawar News : पवारांना विठ्ठल संबोधणं थांबवा, अन्यथा…; अजित पवार गटाला भाजपची तंबी

Ajit Pawar Latest News : अजित पवार गटाच्या मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजभळ यांनी यांसंबंधी विधान केलं होतं. साहेब आमचे विठ्ठल आहेत.
BJP Tushar Bhosle warns Ajit Pawar Faction leaders over Sharad Pawar address as Vitthal NCP Crisis
BJP Tushar Bhosle warns Ajit Pawar Faction leaders over Sharad Pawar address as Vitthal NCP Crisis

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडमोडींना वेग आला आहे. पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट अशी उभी फूट पाहायला मिळत आहे. यादरम्यान अजित पवार गटाकडून साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, असे विधान करण्यात आलं. यावरून आता नवीन वाद पेटताना दिसत आहे.

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून अजित पवार गटाला याबद्दल इशारा देण्यात आला आहे. शरद पवार यांना विठ्ठल म्हणून संबोधणं तत्काळ थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे.

महाराष्ट्राचे अराजध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? म्हणून शरद पवारांना विठ्ठल संबोधणं तात्काळ थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलनं करावी लागतील, असे तुषार भोसले म्हणाले आहेत.

BJP Tushar Bhosle warns Ajit Pawar Faction leaders over Sharad Pawar address as Vitthal NCP Crisis
Sharad Pawar News : वसंतदादा आठवून देणाऱ्या भुजबळांना पवार देणार प्रत्युत्तर? राष्ट्रवादीतील बंडानंतर आज पहिलीच सभा

अजित पवार गटाच्या मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजभळ यांनी यांसंबंधी विधान केलं होतं. साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती भुजबळांनी या सभेत बोलताना शरद पवारांना केली होती. यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

BJP Tushar Bhosle warns Ajit Pawar Faction leaders over Sharad Pawar address as Vitthal NCP Crisis
Pune Crime News : पुणे हादरलं! सुप्रिया सुळेंच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने हत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com