

Satara ZP Election
ESakal
मुंबई : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सातारा जिल्हा परिषदेमध्ये राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड झाली. राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका दूरध्वनीनंतर छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंनी राजकीय खेळी करून हा चुरशीचा विजय मिळविला.