मुख्यमंत्री फडणवीस करणार राज्याची यात्रा; 'फिर एक बार शिवशाही सरकार'

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जून 2019

- यापूर्वी अडवानी, वाजपेयी यांच्याकडून काढली जात होती रथयात्रा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व मतदारसंघात रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेची ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार 220 के पार’ या टॅगलाईन असणार आहेत.

यापूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून लोकसभा निवडणुकांपूर्वी रथयात्रा काढली जात होती. त्यामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचता येत होते. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रथयात्रेला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will be Organized Rath Yatra in Maharashtra