विरोधकांना हिणवणारे भाजप नेते, विरोधी बाकांवर

BJP will now sit in opposition
BJP will now sit in opposition

मुंबई : विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना कमी लेखण्याची चूक भाजपला महागात पडत असल्याचे दिसत आहे. राज्यात सर्वाधिक जागा भाजपच्या आल्या. पण, शिवसेनेसोबत झालेल्या मतभेदांनंतर त्यांना थेट सत्ता स्थापनेतूनच माघार घ्यावी लागली. प्रचार सभांमध्ये विरोधकांना हिवणारे भाजप नेते आता विरोधी बाकांवर बसण्याची शक्यता आहे. 

मी पुन्हा येणार नाही; फडणवीस सरकारची घोषणा

अतिआत्मविश्वास नडला 
'राज्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे', असं म्हणत राज्याचे सध्याचे काळजीवाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रचार सभा गाजवल्या. 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल', असं म्हणत फडणवीस आपल्या भाषणांचा समारोप करत होते. 'राज्यात शरद पवार यांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी झाली आहे. आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पिछे आओ.', असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना कमी लेखले. पण, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीस यांना आज, विरोधी बाकांवर बसावे लागण्याची शक्यता दिसत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप सत्तेत येण्याची चिन्हे दिसत नाहीत. राज्यात प्रदीर्घ काळानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिलेला नेता म्हणून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. पण, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आता तरी संपुष्टात आल्याचे दिसत आहे. 2014मध्ये मोदी लाटेत अभूतपूर्व यश मिळवलेल्या भाजपला यंदाच्या निवडणुकीत मर्यादीत यश मिळाले आहे. पण, निवडणुकी भाजप नेते अतिआत्मविश्वासाने वावरत होते. तसेच विरोधी पक्ष आपल्याला आव्हानच देऊ शकत नाहीत, अशी वक्तव्ये सुरू होती. पण, निकालानंतर शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे त्यांना शक्य नव्हते. शिवसेनेनेही हीच वेळ साधली आणि मुख्यमंत्रिपदाचा विषय ताणून धरला. अखेर युती तुटली आणि भाजपला सत्ता स्थापनेचा नव्हे तर, विरोधात बसण्याचा मार्ग मोकळा झाला. 

अखेर सत्ता समिकरण बदलणार..!

शिवसेनेच्या हालचाली
भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेने बहुमताची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत वाटा आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा, असं नवं समीकरण जुळून येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे  288 पैकी 105 जागा जिंकूनही भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पहिल्या दिवसापासून 'आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे,' असे म्हटले होते. पण, राज्यात पर्यायी सरकार उभारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे येणार असल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com